गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली ‘या’ 5 खेळाडूंचे करिअर संपले? एकदिवसीय आणि कसोटीत करायचे धमाकेदार कामगिरी
2024 सालापर्यंत भारतीय संघ मायदेशातील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अजिंक्य होता. गेल्या अनेक वर्षांत मायदेशात एकाही संघाने भारताचा पराभव केला नव्हता, परंतु गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारत या दोन्ही फॉरमॅटमध्ये अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत चाहते त्या 5 खेळाडूंची आठवण काढत आहेत, ज्यांना गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघात संधीच मिळत नाहीये. या खेळाडूंनी एकेकाळी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या जोरावर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले होते.
गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळत नाहीये. शमीने एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात अप्रतिम कामगिरी करून भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत, तरीही त्याला संधी दिली जात नाहीये. अशीच काहीशी अवस्था एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा ‘मॅच विनर’ गोलंदाज युजवेंद्र चहल याचीही आहे. चहलला देखील संधी मिळत नाहीये. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी शानदार कामगिरी करणाऱ्या इशांत शर्मा, उमेश यादव आणि अजिंक्य रहाणे यांनाही (संघात) स्थान मिळत नाहीये.
Comments are closed.