उदय सामंतांचं फरफेक्ट नियोजन! राज्यात शिंदेंच्या शिवसेनेनं खातं खोललं, पहिला उमेदवार बिनविरोध
रत्नागिरी: राज्यातील 29 महानगरपालिकांची रणधुमाळी नुकतीच संपलेली आहे. यामध्ये भाजपला मोठं यळ मिळालं आहे. यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख होती. अनेकांना उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, राज्यात शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडणून आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आल्या आहेत.
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून डॉक्टर पद्मजा कांबळे या बिनविरोध
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून डॉक्टर पद्मजा कांबळे या बिनविरोध झाल्या आहेत. नाणीज पंचायत समिती गण बिनविरोध करण्यात सामंत यांची व्युव्हरचना आहे. आजच्या शेवटच्या दिवशी कांबळे यांच्या शिवाय एकही उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही. पद्मजा कांबळे यांचा एकमेक अर्ज निवडणुकीत आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ratnagiri news: रत्नागिरीतील उबाठाचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर, उदय सामंतांच्या गौप्यस्फोटाने ठाकरेंच्या गोटात खळबळ
आणखी वाचा
Comments are closed.