तुम्हीही लिपस्टीक, काजळ, पावडर शेअर करता?

जर तुम्ही तुमचे मेकअप प्रॉडक्ट आई, बहीण, मुलगी, किंवा मैत्रीणीबरोबर शेअर करत असाल तर आजपासूनच हे बंद करा. कारण सुंदर दिसण्यासाठी तुम्ही जी लिपस्टीक, पावडर, कंगवा, ब्रश, मस्करा, काजळ, यासारखे मेकअप प्रॉडक्ट वापरता त्यामुळे तुम्ही फक्त आजारीच पडू शकता असे नाही तर तुम्हाला त्वचेचे विकारही होऊ शकतात.

प्रामुख्याने महिला व मुलींना एकमेकांचे कपडेच नाही तर चपला , बॅग, मेकअपचे सामान वापरण्याची सवय असते. याच कारण आहे की त्यांना सतत नवीन गोष्टींची आवड असते. यामुळे बऱ्याचवेळा महिला एकमेकींच्या लिपस्टीक शेड्स आवडल्याने त्या ट्राय करतात. तर कधी समोरचीकडे नाही म्हणून तिला आपल्या वस्तू वापरायला देतात.

यात प्रामुख्याने कधी पावडर, कंगवा, ब्रश, मस्करा, काजळ अशा गोष्टींचा समावेश असतो. पण तुम्हाला माहीत आहे का की जी काजल पेन्सिल किंवा काजळ तुम्ही किंवा समोरच्या व्यक्तीने वापरलेलं असतं तेचं तुम्ही वापरता. काजळ पेन्सिल लावताना पेन्सिलचा थेट संपर्क डोळ्याशी येतो. लाईनर लावतानाही ते थेट पापण्यांवर लावले जाते. तर काजळ लावताना बोटांवर ते घेऊन डोळ्यात लावले जाते. पण जर समोरच्या व्यक्तीला डोळ्यांचा संसर्ग झालेला असेल आणि तुम्ही त्याने वापरलेली काजळ पेन्सिल तुमच्या डोळ्यांसाठी वापरली तर त्यावरील बॅक्टीरिया थेट तुमच्या डोळ्यात जातात. तुम्हालाही संसर्ग होतो. डोळ्याला खाज येणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे यासारखा त्रास सुरू होतो.

असेच लिपस्टीक, लिप ग्लॉस, मस्करा, पावडर, कंगवा वापरतानाही संसर्ग पसरत जातो. त्यामुळे त्वचेवर खाज येणे, पुरळ येणे, त्वचा लाल होणे यासारखी लक्षण त्वचेवर दिसू लागतात.

दुसऱ्या व्यक्तीने मेकअपसाठी वापरलेल्या ब्रशमुळेही त्वचा विकार होतात. त्याचबरोबर बऱ्याचवेळा मुली वॅक्सिंगसाठी एकेमकांचे रेजर,क्रिम वापरतात. त्यामुळेही त्वचा विकाराचा धोका असतो. त्यामुळे मेकअप किट कधीही कोणाशीही शेअर  न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Comments are closed.