तेलंगणा पोलिस गुन्हे नोंदणीची नवीन प्रणाली लागू करणार आहेत

पीडितांचा जबाब घरीच नोंद होणार

सर्कल संस्था/हैदराबाद

तेलंगणात कायदा-सुव्यवस्थेला सुलभ आणि नागरिकांसाठी सोपे करण्यासाठी नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. यात गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी नागरिक केंद्रीत व्यवस्था सुरू केली जाणार आहे. काही खास प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये एफआयआर नोंद करून पीडितांचा जबाब त्याच्या घरी किंवा पसंतीच्या ठिकाणी नोंद करण्यात येणार आहे. या नव्या व्यवस्थेच्या अंतर्गत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. एक आठवड्यात प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हा पुढाकार 27 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चारू सिन्हा यांनी सांगितले आहे.

महिला आणि मुलांच्या विरोधातील गुन्हे, पोक्सो अंतर्गत गुन्हे, एससी/एसटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे, बालविवाह बंदी कायद्याच्या अंतर्गत गुन्हे आणि तेलंगणा रॅगिंग निषेध कायद्याच्या अंतर्गत गुन्ह्यांमध्ये पीडित आणि माहिती देणारे लोक नाजुक किंवा वेदनादायी स्थितीत असतात. तक्रार नेंद करण्यासाठी पोलीस स्थानकात जाण्यासाठी ते शारीरिक किंवा मानसिक स्वरुपात तयार होत नाहीत. याचाच विचार करत तेलंगणा पोलिसांनी अशाप्रकरणांमध्ये एफआयआर नोंद करण्यासाठी स्थानक-केंद्रीय मॉडेलवरून आता नागरिक-केंद्रीत मॉडेल आणले आहे. यात यंत्रणेला पीडितांकडे नेण्यात येणार आहे.

 

Comments are closed.