Parenting Tips: घरातील ‘या’ कामांमुळे मुलांची बुद्धी होते तीक्ष्ण
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ अभ्यासच नाही, तर घरातील छोटी-मोठी कामेही खूप महत्त्वाची असतात. संशोधनानुसार, जी मुले घरकामात मदत करतात, त्यांची निर्णयक्षमता आणि बुद्धिमत्ता इतरांपेक्षा वेगाने विकसित होते. घरातील काही कामांमुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते. ( Tips to boost child intelligence )
भाज्या निवडणे
जेव्हा मुले मेथी, कोथिंबीरसारख्या भाज्या निवडतात, तेव्हा त्यांच्या हातांच्या बोटांच्या हालचालींमुळे ‘Fine Motor Skills’ विकसित होतात. तसेच वेगवेगळ्या भाज्यांचे वर्गीकरण केल्यामुळे त्यांची निरीक्षण शक्ती आणि तर्कशक्ती वाढते.
जेवणाचे ताट वाढणे
घरात जवानांचे ताट वाढताना ताटे किती आहेत, वाट्या किती लागतील, चमचे कोणत्या बाजूला ठेवायचे, हे ठरवताना मुलांच्या मेंदूमध्ये जागेचे नियोजन (Spatial Awareness ) आणि गणिताची प्राथमिक समज निर्माण होते.
झाडांना पाणी घालणे
निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आणि झाडांची काळजी घेतल्याने मुलांमध्ये सहानुभूती आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. झाडांना पाणी घालताना त्यांची आकलनशक्ती सुधारते.
स्वतःची खोली, खेळणी आवरणे
आपले सामान योग्य ठिकाणी ठेवल्यामुळे मुलांमध्ये नियोजन कौशल्य विकसित होतात. गोष्टी क्रमाने लावल्यामुळे मेंदूला शिस्त लागते आणि एकाग्रता वाढते.
Comments are closed.