3 शतकं मारली तरी संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय; असं खेळलो तर वर्ल्ड कप कसं जिंकणार?

2026 टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. खराब फॉर्ममुळे शुभमन गिलला टी-20 संघातून बाहेर काढण्यात आले आहे. हा तोच शुभमन गिल आहे, ज्याला लोकांनी ‘संजू सॅमसनची जागा खाल्ली’ असे म्हणून ट्रोल केले होते. सलामीवीर (Openner) म्हणून सॅमसनच्या 3 शतकांचे जगभर कौतुक झाले, पण खरी आकडेवारी मात्र काहीतरी वेगळेच सांगते.

ही 2024 सालची गोष्ट आहे, जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संजू सॅमसनने ओपनिंग करताना 5 डावांत तीन शतके ठोकली होती. फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या अखेरपर्यंत सॅमसनने सलामीला फलंदाजी केली. त्यानंतरच्या मालिकेत शुभमन गिलचे टी-20 संघात पुनरागमन झाले, ज्यानंतर सॅमसनचा फलंदाजीचा क्रम सतत बदलत राहिला आणि पुढे जाऊन त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणेही बंद झाले. टी-20 सामन्यांत गिल चांगली कामगिरी करू शकत नव्हता, त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले आणि त्याच तीन शतकी खेळींमुळे संजू सॅमसनला चाहत्यांची सहानुभूती मिळाली.

आता संजू सॅमसनची टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघात निवड झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तिन्ही टी-20 सामन्यांत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तीन डावांत सॅमसनने 13 चेंडूंचा सामना करत केवळ 16 धावा केल्या आहेत. गुवाहाटीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

ज्या ओपनिंग बॅटिंगसाठी सॅमसनची प्रशंसा केली जात होती, त्याच क्रमांकावर गेल्या एक वर्षात सॅमसनची सरासरी फक्त 11 ची राहिली आहे. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सॅमसनने सलामीवीर म्हणून 9 डावांत केवळ 109 धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलेले नाही आणि त्याची सरासरी 11.55 इतकी राहिली आहे. सलामीला खेळताना सॅमसन गेल्या 9 डावांत केवळ एकदाच पॉवरप्लेनंतर खेळपट्टीवर टिकू शकला आहे. सॅमसनची ही आकडेवारी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे

Comments are closed.