महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती खालावली आहे.
लखनौमधील मेदांता रुग्णालयात रेफर
वृत्तसंस्था/ अयोध्या
उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष आणि मणिराम छावणीचे महंत नृत्य गोपालदास यांची प्रकृती अचानक पुन्हा बिघडली आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना अयोध्येतील सरकारी श्रीराम रुग्णालयातील निवृत्त डॉक्टर डॉ. एस. के. पाठक यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. तथापि, उलट्या आणि जुलाबामुळे त्यांची प्रकृती सतत बिघडत असल्याने त्यांना लखनौमधील मेदांता रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. गेल्यावर्षीही त्यांची प्रकृती लक्षणीयरीत्या बिघडली होती. लखनौमधील मेदांता रुग्णालयातील उपचारानंतर बरे झाल्यापासून ते स्थिर होते. आता पुन्हा प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महंत नृत्य गोपालदास महाराज यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आल्यानंतर अयोध्येतील श्रीराम रुग्णालयातील एक पथक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. या पथकाने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली होती.
Comments are closed.