राष्ट्रपती १९ मार्चला अयोध्येला भेट देणार आहेत.
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाचे रितसर निमंत्रण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने 19 मार्च 2026 रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदेनिमित्त श्रीराम जन्मभूमी संकुलात होणाऱ्या कार्यक्रमासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण पाठवले आहे. या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील श्रीराम यंत्राची स्थापना केली जाणार आहे. याप्रसंगी राष्ट्रपती 19 मार्च रोजी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेतील. राष्ट्रपतींना श्रीराम जन्मभूमी संकुलात होणाऱ्या कार्यक्रमासाठीचे निमंत्रण ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटून देण्यात आले. याप्रसंगी सरचिटणीस श्री चंपत राय, कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी जी, विश्वस्त श्री कृष्णमोहन आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री नृपेंद्र मिश्रा यावेळी उपस्थित होते.
Comments are closed.