रिंकूने केली धोनीच्या ‘बलाढ्य’ विक्रमाशी बरोबरी, हार्दिक पहिल्या स्थानावर

टी२० क्रिकेटमध्ये भारताचा स्टार फलंदाज रिंकू सिंग चांगलेच मैदाने गाजवत आहे. त्याने स्फोटक फलंदाजी करत गोलंदाजांना सळे की पळो करून सोडले आहे. त्याची अशीच एक उल्लेखनीय कामगिरी पुन्हा एकदा दिसली. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (२१ जानेवारी) मालिकेतील पहिला टी२० सामना खेळला गेला. यामध्ये रिंकूने शेवटच्या षटकात दोन षटकार मारत भारताचा दिग्गज एमएस धोनी याच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

रिंकू टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शेवटच्या षटकात अधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने धोनीसह संयुक्तपणे दुसरे स्थान गाठले असून कर्णधार सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. या यादीत हार्दिक पंड्या पहिल्या स्थानावर आहे.

हार्दिकने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २० षटकात ९९ चेंडू खेळताना १५ षटकार मारले आहेत. रिंकूने केवळ ३८ चेंडूत १२ षटकार मारले. तसेच दुसऱ्या स्थानी असणाऱ्या धोनीने १३२ चेंडूत १२ षटकार मारले आहेत. सूर्यकुमारने ११ षटकार (२८ चेंडू) मारले आहेत. तसेच दिनेश कार्तिकने ९ (४९ चेंडू) आणि विराट कोहलीने ८ (५८ चेंडू) षटकार मारले आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध रिंकूने २० चेंडू खेळताना ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ४४ धावा केल्या. तसेच अभिषेक शर्माच्या ८४ धावा यामुळे भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावत २३८ धावसंख्या उभारली.

रिंकू भारताच्या मागील टी२० मालिकेचा भाग नव्हता, मात्र तो टी२० विश्वचषकासाठी संघात आहे. संघात त्याच्यासाठी योग्य जागा नसल्याने त्याला संधी मिळत नव्हत्या, आता मात्र त्याने फिनिशरची भुमिका निभावत संघातील स्थान पक्के केले आहे.

भारतासाठी टी२०च्या २०व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज-
१५ – हार्दिक पंड्या (९९ चेंडू)
१२ – रिंकू सिंग (३८*)
१२ – एमएस धोनी (१३२)
११ – सूर्यकुमार यादव (२८)
९ – दिनेश कार्तिक (४९)
८- विराट कोहली (५८)

न्यूझीलंड विरुद्धचा पहिला टी२० सामना भारताने ४८ धावांनी जिंकला. पाच मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२३ जानेवारी) रायपूर येथे खेळला जाणार आहे. ही मालिका दोन्ही संघासाठी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाची आहे.

Comments are closed.