आमच्या 4 नगरसेवकांना शिंदेसेनेने डांबून ठेवलंय, ठाकरे गटाचा मोठा आरोप, कल्याण डोंबिवलीत मोठा रा
KDMC राजकारण मनसेचा शिवसेनेला पाठिंबा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेचे नाट्य रंगात आले असतानाच आता नगरसेवक पळवापळवी आणि डांबून ठेवण्याच्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे चार नगरसेवक सध्या शिंदे गट आणि मनसेच्या संपर्कात असल्याचा दावा करत, ठाकरे गटाचे पदाधिकारी अल्पेश भोईर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर या नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
महायुतीमधील शिंदे गटाला मनसेने पाठिंबा जाहीर केल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत ठाकरे बंधूंच्या उद्धव ठाकरे पक्षांमध्ये वाद पेटला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटाने मनसेची साथ घेतली आहे. मात्र, या सत्तासमीकरणात ठाकरे गटाचे चार नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे.
‘त्यांना डांबून ठेवलंय….’, ठाकरे गटाचा दावा
ठाकरे गटाचे पदाधिकारी अल्पेश भोईर यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक माहिती दिली. “आमच्या चारही नगरसेवकांना डांबून ठेवण्यात आले आहे. ते आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शिंदे गट किंवा मनसेला पाठिंबा देण्याची कोणतीही इच्छा नाही, असे ते आम्हाला सांगत आहेत,” असा दावा भोईर यांनी केला आहे.
पोलीस तक्रारीचा इशारा
युती जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, काही जणांना आम्ही समजावले पण या चौघांना पळवून नेल्याचा संशय ठाकरे गटाला आहे. “मनसे नेत्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की, अशा पद्धतीने नगरसेवकांना डांबून ठेवणे हा गुन्हा आहे. जर आज या नगरसेवकांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर आम्ही पोलीस ठाण्यात ते मिसिंग असल्याची तक्रार नोंदवू, असेही भोईर यांनी ठणकावून सांगितले.
राजकीय पेच वाढला
एकीकडे शिंदे गट आणि मनसे एकत्र येऊन सत्तास्थापनेचा दावा करत असताना, दुसरीकडे ठाकरे गटाने आपल्या नगरसेवकांना परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाईची तयारी दर्शवली आहे. या नाट्यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.