टी20 वर्ल्डकप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत ‘या’ दिवशी
क्रिकेटविश्वात फेब्रुवारी महिन्यात पुरूषांच्या वरिष्ठ संघाच्या टी२० विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरूवात होणार असून स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यासाठीच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) मंगळवारी (२७ जानेवारी) जाहीर झाले आहे. यामध्ये भारत एचे दोन सराव सामने होणार आहेत.
या स्पर्धेत भारत गतविजेत्याच्या रूपात स्पर्धेत उतरणार असून चांगली सुरूवात करण्यावर यजमानांचा भर असणार आहे. या स्पर्धेआधी भारत ए नामिबिया आणि अमेरिकेविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. हे वेळापत्रक आधीच जाहीर होणार होते, मात्र बांगलादेश क्रिकेटच्या गोंधळामुळे त्याला उशिर झाला.
या स्पर्धेत भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ फेब्रुवारीला मुंबई येथे सराव सामना खेळणार आहे. हा सामना डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. काही सराव सामने बेंगलोरच्या सीओई, चेन्नई, नवी मुंबई आणि कोलंबो येथेही खेळले जाणार आहेत.
या स्पर्धेचे सराव सामने पुढीलप्रमाणे- २ फेब्रुवारीला अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉलंड सामना बेंगलोरमध्ये, अमेरिका विरुद्ध भारत ए सामना मुंबईमध्ये आणि कॅनडा विरुद्ध ईटली सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. ३ फेब्रुवारीला ओमान विरुद्ध श्रीलंका ए (कोलंबो), नेदरलॅंड्स विरुद्ध झिम्बाब्वे (कोलंबो) आणि नेपाळ विरुद्ध युएई (चेन्नई) सामने होणार आहेत.
तसेच ४ फेब्रुवारीला स्कॉटलंड विरुद्ध नामिबिया (बेंगलोर), अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (बेंगलोर), पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड (कोलंबो) आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मुंबई) हे सामने आहेत. ५ फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध ओमान (कोलंबो), नेपाळ विरुद्ध कॅनडा (चेन्नई), ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलॅंड्स (कोलंबो) आणि न्यूझीलंड विरुद्ध अमेरिका (मुंबई) हे सराव सामने खेळले जाणार आहेत.
त्याचबरोबर ६ फेब्रुवारीला ईटली विरुद्ध युएई (चेन्नई) आणि नामिबिया विरुद्ध भारत ए (बेंगलोर) असे दोन सराव सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेत भारत अ गटात आहे. यामध्ये अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सचा सहभाग आहे.
टी20 वर्ल्डकप 2026मधील भारताचे सराव सामने-
2 फेब्रुवारी अमेरिका वि. भारत ए ( मुंबई)
4 फेब्रुवारी दक्षिण आफ्रिका वि. भारत (मुंबई)
६ फेब्रुवारी नामिबिया विरुद्ध भारत अ (बेंगळुरू)
Comments are closed.