परळीतील पराभवानंतर शरद पवार गटात पहिला राजीनामा, ‘पक्षात दलालाचा कारभार’ म्हणत जिल्हा सरचिटणीसा

बीड राष्ट्रवादीचे शरद पवार बीडच्या परळी नगरपरिषदेमध्ये (Parli Nagarparishad) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Faction) पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्वतः खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी प्रचारात उतरत प्रतिष्ठा पणाला लावली होती. परंतु तरीदेखील पराभव झाल्यानंतर आता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी राजीनामा देत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर देखील आरोप केले आहेत.

पक्षात दलालाचा कारभार झाला असून पक्षातील सुपारीबाज लोकांच्या कारभारा कंटाळून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. खासदारांच्या चुकीच्या नियोजनाचा बोलबाला दिसत असल्याने तक्रार कुठे करायची? असे म्हणत देवराव लुगडे यांनी आपल्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

Beed NCP Sharad Pawar: शरद पवार गटातील धुसफुस चव्हाट्यावर

यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील धुसफुस चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलय. विकास पुरुष म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या विचारांना मानणारा मोठ्या वर्ग असताना देखील या ठिकाणी चुकीचे ध्येयधोरणे राबवल्यामुळे मी खासदारांना व्हिडिओ कॉल करून याबाबत तक्रार दिली होती, त्याकडेही दुर्लक्ष केल्याच लुगडे म्हणाले आहेत. आता लुगडे यांच्या आरोपांवर खासदार बजरंग सोनवणे काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bajrang Sonwane: देवराव लुगडेंनी याआधीही केली होती खासदारांवर टीका

दरम्यान, देवराव लुगडे यांनी याआधी फेसबुक लाईव्ह करत खासदार बजरंग सोनवणे यांना थेट लक्ष्य करत, पक्ष संघटन, उमेदवार निवड आणि भांडवलदारांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्यावर गंभीर सवाल उपस्थित केले होते. “या भागात पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका. येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या,” असे आवाहन त्यांनी बजरंग सोनवणे यांना केले होते.

तर “अडचणीच्या काळामध्ये आम्ही पक्ष वाढवायचा. आम्ही लोकांमध्ये जायचं, आम्ही दुश्मनी घ्यायची,  आंदोलन करायचे, अंगावर खोट्या केस घ्यायच्या, आम्ही एवढेच काम करायचं का? आणि निवडणुकीत आलेल्या दलाल लोकांना तुम्ही सोबत घेत असाल, पुन्हा आमच्या गोरगरिबांची ही भावना होऊ देऊ नका की हा भांडवलदारांचा, श्रीमंताचा पक्ष आहे. श्रीमंती आणि पैसा बघून इथे प्राधान्य दिले जाते. चाटुगिरी, भामटेगिरी, पुढे-पुढे करणाऱ्याला प्राधान्य दिले जाते ही आमची मानसिकता होऊ देऊ नका. कारण हा पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. येणाऱ्या काळात परळीत पक्ष उभा करायचा असेल तर चांगल्या लोकांना सोबत घ्या,  असे खडेबोल देवराव लुगडे यांनी बजरंग सोनवणे यांना सुनावले होते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Beed News: ‘बायको नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा’; बीडमध्ये तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला अन्…; प्रजासत्ताक दिनी पोलिसांची धावपळ

आणखी वाचा

Comments are closed.