भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार हा ऐतिहासिक क्षण : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. या डीलला आता मदर ऑफ ऑल डील म्हटलं जातेय.
युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष एंतोनियो लुईस सांतोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या कराराची घोषणा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं.
India EU Trade Deal : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांवेळी एंतोनियो लुईस सांतोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांचं स्वागत केलं. काल पहिल्यांदा युरोपियन युनियनचे नेते पहिल्यांदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले.आज आणखी एक ऐतिहासिक प्रसंग आहे, जगातील दोन मोठ्या लोकशाही शक्ती त्यांच्या संबंधात निर्णायक अध्यायाची सुरुवात करत आहेत. गेल्या काही वर्षात भारत आणि युरोपियन युनियनच्या संबंधांत वाढ झाली आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत आणि युरोपियन यूनियन यांच्यात 180 अब्ज युरोचा व्यापार आहे. 8 लाखांपेक्षा अधिक भारतीय युरोपियन यूनियन देशात राहत आहेत. स्ट्रॅटेजिक टेक्नेलॉजी,क्लीन एनर्जी, डिजिटल गव्हर्नन्स ते डेव्हलपमेंट पार्टनरशिपपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात सहयोगाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. यासह आजच्या कराराद्वारे समाजाच्या सर्व वर्गांना लाभ पोहोचवणारे निर्णय घेतले आहेत,असं मोदी म्हणाले.
भारतानं आपल्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. हा एक ऐतिहासिक करार आहे. यामुळं शेतकरी आणि छोट्या उद्योगांना युरोपियन बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. उत्पादन क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील. सेवा क्षेत्रात सहकार्य अधिक प्रबळ करेल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
या करारामुळं भारत आणि युरोपियन युनियनमध्ये गुंतवणुकीला बुस्ट मिळेल. नव्या नाविन्यता भागीदाऱ्या बनतील. जागितक पातळीवर पुरवठा साखळीला मजबूत करेल. हा फक्त मुक्त व्यापार करार नसून भागिदारी समृद्धीची नवी ब्लू प्रिंट असेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आम्ही मोबिलिटीसाठी नवा फ्रेमवर्क तयार करत आहोत. यामुळं भारतीय विद्यार्थ्यांना युरोपियन युनियनमध्ये संधी मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य प्रत्येक कराराचा पाया असतो. आम्ही आज याला सुरक्षा आणि संरक्षण भागीदारीतून औपचारिक रुप देत आहोत. यातून दहशतवादाविरोधातील लढा, सागरी सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यातील भागीदारी मजबूत होईल, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.