Mumbai News – मालाडमध्ये घरगुती सिलेंडरचा स्फोट, सात जण जखमी

मालाडमधील मालवणी परिसरात मंगळवारी घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात सात जण भाजले आहेत. जखमींपैकी 4 जणांना आधार रुग्णालयात आणि 3 जणांना क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मालवणी गेट क्रमांक 8, ए.सी. मशिदीजवळ, भारत माता शाळेच्या बाजूला असलेल्या चाळीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 9.25 वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, अदानी इलेक्ट्रिसिटी, 108 रुग्णवाहिका आणि बीएमसी वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. अग्निशमन दलाने तात्काळ आग विझवण्यास सुरूवात केली. गॅस सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने स्फोट होऊन आग लागली. जखमींना स्थानिकांनी क्रिटी केअर रुग्णालयात नेले आहे, असे एका वरिष्ठ आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितले.

Comments are closed.