U19 WC 2026: वैभवचं विस्फोटक अर्धशतक, विहानचं जबरदस्त शतक; टीम इंडियाने उभारला धावांचा डोंगर

अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या सुपर-6 फेरीचे सामने खेळवले जात आहेत. या टप्प्यात आज भारतीय संघ आपला पहिला सुपर-6 सामना खेळत आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील हा महत्त्वाचा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायो येथील ऐतिहासिक क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात खेळताना भारतीय संघाने विहान मल्होत्राच्या शतकी खेळीच्या जोरावर मर्यादित 50 षटकांत 352 धावांचा डोंगर उभारला.

पहिल्या डावात भारतीय संघाने सलामीला एरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी यांना पाठवले. सलामीला अपेक्षेनुसार आयुष म्हात्रे फारसा प्रभाव दाखवू शकला नाही, त्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आला. सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आयुष 21 धावांवर बाद झाला. वैभव सूर्यवंशीने विस्फोटक शैलीत 52 धावा केल्या, मात्र त्याला मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करता आले नाही. संघ एकेकाळी 130 धावांवर चार विकेट्स गमावून बॅकफूटवर आले.

पाचव्या क्रमांकावर आलेल्या विहान मल्होत्राने संघाला सामन्यात पुन्हा मजबूत स्थितीत आणले. त्याने अभिज्ञान कुंडूसोबत 113 धावांची मोलाची भागीदारी केली. फिनिशरच्या भूमिकेत खेळलेल्या खिलान पटेलने 12 चेंडूत 30 धावा करत संघाला अंतिम षटकांत 350 धावांचा टप्पा सहज गाठायला मदत केली.

अशा प्रकारे भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर 353 धावांचे महत्वाचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाच्या या टप्प्यातील फलंदाजी संघासाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली असून, विशेषतः मल्होत्रा आणि कुंडूची भागीदारी ही संघाला आत्मविश्वास आहे.

Comments are closed.