Shanivarwada:पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा वर्धापनदिन Special Report
Shanivarwada : पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा वर्धापनदिन Special Report
पुण्यातील देदीप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेल्या शनिवार वाड्याचा २९४ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. २२ जानेवारी १७३२ रोजी थोरले बाजीराव पेशवे यांनी या वाड्याचा ‘वास्तुशांती’ सोहळा पार पाडला होता. त्यानंतरच्या काळात जसा मराठा साम्राज्याचा विस्तार होत गेला, तसे या वास्तूचे राजकीय महत्त्वही वाढत गेले. पेशवाईच्या सुवर्णकाळात, संपूर्ण हिंदुस्थानचा राज्यकारभार याच ऐतिहासिक वास्तूमधून हाताळला जात असे. मात्र, हा वाडा केवळ वैभवाचाच नाही, तर अनेक नाट्यमय आणि खळबळजनक ऐतिहासिक घटनांचाही मूक साक्षीदार राहिला आहे. पेशव्यांच्या शौर्याच्या, राजकारणाच्या आणि संघर्षाच्या अनेक स्मृती या भिंतींमध्ये आजही जिवंत आहेत. आज शनिवार वाडा हे पुण्याचे प्रमुख ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून, तो आपल्या वैभवशाली मराठा साम्राज्याचा वारसा दिमाखात जपत उभा आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने वाड्याच्या गौरवशाली इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.
Comments are closed.