Keral Crime News : सोशल मिडियावरच्या व्हिडीओने घतला जीव, व्हायरल व्हिडिओ ठरला आत्महत्येचं कारण
Keral Crime News : सोशल मिडियावरच्या व्हिडीओने घतला जीव, व्हायरल व्हिडिओ ठरला आत्महत्येचं कारण
गेले काही दिवस केरळमधला हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आहे. कारण याच व्हिडिओमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीने आपलं जीवन संपवलंय. तारीख १६ जानेवारीची, केरळच्या पय्यानूर रेल्वे स्थानकातून अरिकोडला जाण्यासाठी एक खाजगी बस निघाली.याच बसमधून प्रवास करत होते एन्फ्लूएन्सर शिमजिथा मुस्तफा आणि दीपक यू. शिमजिथाने बसमध्ये एक १८ सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत दीपकने तिला अश्लील स्पर्श केल्याचा आरोप केला. शिमजीथाने हा व्हिडिओ सोशल मिडियात अपलोड करताच तो व्हायरल झाला. शिमजीथाच्या आरोपांमुळे आणि होत असलेल्या बदनामीमुळे दिपक इतका व्यथीत झाला की त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.दिपकच्या आत्मह्तयेनंतर त्याच्या कुटुंबियांनी शिमजीथा मुस्तफावर टीकेची झोड उठवली आहे. हा व्हिडिओ वायरल झाल्यापासून दिपक मानसिक तणावात गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बदनामीच्या भितीने दिपकने दोन दिवस जेवणही केलं नसल्याचं त्याच्या आई वडिलांनी सांगितलं. रविवारी १८ जानेवारीला सकाळी आई वडिलांनी त्याच्या रुमचा दरवाजा ठोठावला. बराच वेळ दीपकने दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने आई वडिलांनी दरवाजा उघडला असता दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सध्या दीपकच्या आत्महत्येप्रकरणी शिमजीथा मुस्तफाला पोलिसांनी अटक केलीये. तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला गेलाय. दरम्यान बसचं सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं असता फुटेजमधून छळाचा कोणताही प्रकार समोर आला नसल्याची माहिती आहे. बस कर्मचाऱ्यांनीही शिमजिथाचे दावे फेटाळल्याचं कळतंय.या घटनेनंतर सोशल मिडीयात काही नवे व्हिडीओजही वायरल होतायेत. ज्यात बसने प्रवास करताना पुरूष कोर्ड बोर्ड किंवा क्रिकेट मधील पॅड्स शरीराला लावून प्रवास करताना दिसतायेत. केरळमधल्या या घटनेबद्दल आता शिमथीजाच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले जातायेत. शिमथीजाच्या दाव्यानुसार जर दीपक तिला चुकीचा स्पर्श करत होता तर तिने तेव्हाच विरोध का केला नाही.घडलेल्या घटनेची शिमथीजाने पोलिसात तक्रार का केली नाही. या व्हिडिओत शिमथीजाने तिच्या कॅमेराचा बदलेला अँगल आणि व्हिडिओत असलेल्या कटस् वरुनही अनेकांनी आक्षेप घेतलाय. बसमधल्या या १८ सेकंदांच्या व्हिडिओनं दीपकला त्याचं आयुष्य संपवायला भाग पाडलं. त्यामुळे केवळ काही लाईक्स आणि व्ह्युजच्या हव्यासापोटी आणि प्रसिद्धीसाठी आपण एखाद्याचं आयुष्य तर उद्ध्वस्त करपत नाही ना याची जाणीव ठेवायला हवी.
Comments are closed.