T20 WC 2026: यामुळे विंडीजचा संघ अधिक मजबूत होईल; भारतीय परिस्थितीबाबत ड्वेन ब्रावोचे मोठे विधान

वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने (Davon Bravo) म्हटले आहे की, आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळपट्ट्यांची आणि परिस्थितीची माहिती त्याच्या संघाला अधिक मजबूत करेल. टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेतील विविध शहरांमध्ये खेळला जाणार आहे. ब्रावोने सध्याच्या संघातील अनुभव आणि संतुलनाचेही कौतुक केले. तो म्हणाला, संघात खूप ताकद आणि अनुभव आहे. शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल आणि ब्रँडन किंग सारखे या फॉरमॅटमधील उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि शाई होप संघाचे नेतृत्व करत आहे.

अकिल हुसेन हा जगातील सर्वोत्तम टी-20 गोलंदाजांपैकी एक आहे. ब्रावो 2016 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. संघातील तरुण आणि अनुभवी खेळाडूंच्या मिश्रणाचे कौतुक करताना तो म्हणाला, तरुण खेळाडूंसोबतच जेडेन सील्स आणि शमार जोसेफसारखे खेळाडू देखील आहेत. एकूणच हे एक चांगले संतुलन आहे. भारतीय परिस्थितीची माहिती असणे संघासाठी फायदेशीर ठरू शकते.

तो पुढे म्हणाला, अनेक खेळाडूंनी भारतात आयपीएलमध्ये खेळले आहे आणि येथील परिस्थिती बऱ्याच अंशी आमच्या (कॅरेबियन) परिस्थितीसारखीच आहे. आशा आहे की यामुळे त्यांना या स्पर्धेत चांगली संधी मिळेल. ब्रावो सध्या ‘वर्ल्ड लेजेंड्स प्रो टी-20 लीग’मध्ये पुणे पँथर्सकडून खेळणार आहे. गोव्यात खेळल्या जाणाऱ्या या लीगबद्दल तो म्हणाला, हे एक असे ठिकाण आहे जिथे मला नेहमीच यायचे होते. मी इतर खेळाडूंकडून याबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि हे ठिकाण खूप काही कॅरेबियन देशांसारखे वाटते.

Comments are closed.