कोण आहे पाकिस्तानचा युवा स्टार अब्दुल सुभान? टीम इंडियासाठी ठरू शकतो मोठा धोका

एसीसी अंडर-19 आशिया कप 2025 जिंकल्यानंतर पाकिस्तानचा संघ आयसीसी अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 खेळण्यासाठी आला आहे. पाकिस्तानने आपला तोच फॉर्म या टूर्नामेंटमध्येही कायम राखला आहे. याच कारणामुळे मोठ्या संघांविरुद्धही ते चांगली कामगिरी करत आहेत. पाक संघाच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले आहे. यामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चा अब्दुल सुभानची (Abdul Subhaan) होत आहे. या वेगवान गोलंदाजाने फलंदाजांची झोप उडवली आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज अब्दुल सुभानने न्यूझीलंड अंडर-19 क्रिकेट टीमविरुद्ध 6.3 षटकांमध्ये 11 धावा देऊन 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. याच कामगिरीमुळे त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. या स्पर्धेत आतापर्यंत त्याने 4 सामन्यात केवळ 9.44 च्या सरासरीने 9 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजांना त्याच्याविरुद्ध धावा काढताना मोठी अडचण येत आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना आता भारताविरुद्ध होणार आहे. त्या सामन्यात अब्दुल सुभान धोकादायक ठरू शकतो. इंडिया अंडर-19 क्रिकेट टीमविरुद्ध त्याने 2 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत, 1 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात भारतीय फलंदाज या गोलंदाजाला जपून खेळू इच्छितील.

Comments are closed.