बाबरसोबत रिजवान-आफ्रिदीला लागला 100 कोटींचा चुना! वाचा काय आहे नेमके प्रकरण

पाकिस्तान क्रिकेट नेहमीच काहींना काही विचित्र घटनांमुळे चर्चेत असतो. क्रिकेटविश्वात आता ते आणखी एका घटनेमुळे चर्चेत आले आहेत. यामधून पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या अडचणी काही कमी होत असताना दिसत नाही. नुकतेच त्यांच्या काही क्रिकेटपटूंना एका स्किममधून मोठे नुकसान झाल्याचे वृत्त समोर येत आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी यांच्या समवेत अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंची एका व्यवसायिकाने १०० कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याचे समजते.

काही रिपोर्ट्नुसार, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना पॉन्झी स्किममध्ये एका मोठ्या व्यवसायिकाने फसवल्याचे समजते. यामध्ये फखर जमान, शादाब खान आणि पाकिस्तानच्या एका माजी कसोटी कर्णधाराचा देखील समावेश आहे.

ही पॉन्झी स्किक नक्की आहे तरी काय? यामध्ये नव्या गुंतवणूकदारांकडून पैसे आले असता जुन्या गुंतवणूकदांराना त्याचा परतावा दिला जातो. जेव्हा नवे फंड येण्याचे थांबते तेव्हा ही स्किम तोट्यात जाऊन अधिक नुकसान होते.

त्या पाकिस्तानी व्यवसायिकाने वरील क्रिकेटपटूंना पैसे गुंतवत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. काही कालावधीनंतर ही स्किम फसल्याचे खेळाडूंच्या लक्षात आले आणि त्यांनी पैसे परत मागण्यास सुरूवात केली. तेव्हा त्या व्यवसायिकाने त्याला नुकसान झाले असून नंतर पैसे देतो असे म्हणत वेळ टाळली आणि आता तो फरार झाल्याचे समजते.

तो व्यवसायिक खेळाडूंना चांगलाच ओळखत होता. तसेच त्याने पाकिस्तान सुपर लीगच्या अनेक फ्रॅंचायजींचे प्रायोजकत्वही (स्पॉन्सर्स) स्विकारल्याचे कळते. तेथूनच या स्किमला सुरूवात झाली होती आणि खेळाडूंनी पैसे गुंतवले. तेव्हा सुरूवातीला खेळाडूंना त्यातून आर्थिक फायदाही झाला होता. काही काळानंतर पैसे येण्याचे बंद झाले आणि आता काहीतरी गडबड झाल्याचे कळाले. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या घटनेचा अधिक तपास करणार असल्याचेही समजते.

Comments are closed.