किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहोचला, सागरला एकाने जोरात ढकलले अन्…; जळगावात रक्तरंजित थरार

जळगाव क्राईम न्यूज : जळगाव (Jalgaon) तालुक्यातील आव्हाणे गावात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सागर अरुण बिऱ्हाडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Jalgaon Crime News: Crime news: किरकोळ खेळाडूचा आलेख

आव्हाणे गावातील जुना मारुती मंदिर परिसरात सागर बिऱ्हाडे याचा एका व्यक्तीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक असलेला हा वाद काही वेळातच हाणामारीत रूपांतरित झाला. यावेळी आरोपीने सागरला जोरात ढकलल्याने तो खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.

Jalgaon Crime News: उपचाराआधीच सागरचा मृत्यू

जखमी अवस्थेत सागरला तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केले. हा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.

The Jalgaon Crime News : जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे.

सागरचा मृत्यू घोषित होताच जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला असून, रात्री उशिरापर्यंत परिस्थिती तणावपूर्ण होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रुग्णालय परिसरात बंदोबस्त वाढवला होता.

जळगाव क्राईम न्यूज : एलसीबीने तपास केला वेग

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पथकाने मृताच्या नातेवाईकांकडून सविस्तर माहिती घेत तपासचक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

https://www.youtube.com/watch?v=a5B0FhXuLoY

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : अडीच महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लावर लैंगिक अत्याचार, मालाडमध्ये विकृत मानसिकतेचे भयावह रुप, 20 वर्षांच्या नराधमाला अटक

Badlapur Crime News: बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे, ‘त्या’ स्कूल व्हॅनबाबत धक्कादायक माहिती उघड

आणखी वाचा

Comments are closed.