आंध्र प्रदेशात बस आणि ट्रकची धडक, 3 जणांचा मृत्यू.

मृतांमध्ये दोन्ही चालकांचा समावेश

नंद्याल: आंध्रप्रदेशच्या नंदयाल जिल्ह्यात भीषण रस्ते दुर्घटन घडली आहे. एक बस अन् ट्रकची टक्कर झाल्यावर वाहनांना भीषण आग लागली. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. संबंधित बस आंध्रप्रदेशच्या नेल्लोर येथून तेलंगणातील हैदराबादच्या दिशेने जात असताना अचानक टायर फुटल्याने बस अनियंत्रित झाली. नियंत्रण गमावल्यावर बस प्रथम दुभाजकाला धडकली आणि मग समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. कंटेनर ट्रकमधून दुचाकींची वाहतूक केली जात होती. टक्कर झाल्यावर बस अन् ट्रकला आग लागली. यामुळे बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढावे लागले.

Comments are closed.