'जैश'चा पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला आहे.
काश्मीरमधील कठुआ जिह्यात चकमक : शस्त्रास्त्रेही जप्त
वृत्तसंस्था/ उज्जैन
मध्यप्रदेशात उज्जैनमधील शांततापूर्ण तराणा परिसर अशांततेत बुडाले आहे. उज्जैनमधील तराणा येथे गुरुवारी रात्री सुरू झालेल्या वादाचे रुपांतर शुक्रवारी दुपारी हिंसाचार, दगडफेक आणि जाळपोळीत झाले. एका दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने शहरात अफवा पसरल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी दुकानाला आग लावली आहे. त्यानंतर हिंसाचार वाढत गेल्याने शुक्रवारीही शहरात तणावपूर्ण वातावरण होते. अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असून त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. या हिंसाचार आणि हल्ल्यामागे मिर्झा टोळीचा हात असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तसेच तराणा परिसरात अतिरिक्त पोलीस दलही तैनात केले आहे.
शहरात हिंसाचार माजवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. तसेच परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी 10 पोलीस ठाण्यांमधील पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. भडकलेल्या परिस्थितीवर सहा निरीक्षक लक्ष ठेवून आहेत. वृत्तानुसार, गुरुवारी रात्री एका हिंदू नेत्याला मारहाण करण्यात आली. या नंतर इशान मिर्झा, शादाब उर्फ इडली मिर्झा, सलमान मिर्झा, रिजवान मिर्झा आणि नावेद यांनी सप्पन मिर्झासह अन्य दंगलखोरांनी गोंधळ घातला. दोन गटांमधील वादानंतर ही हिंसक बाचाबाची झाल्यानंतर बजरंग दलाचे अधिकारी सोहिल ठाकूर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यात विहिंपचे अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विहिंपचे अधिकारी सोहिल ठाकूर हे आरएसएस कार्यालयाजवळ असताना सुमारे 15 मुस्लीम तरुणांच्या एका गटाने त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. गोरक्षणाच्या नावाखाली वाहने जप्त करणे थांबवले नाही तर त्याचे परिणाम भयानक होतील, अशी धमकी त्यांना देण्यात आली. हा वाद वाढला असतानाच सोहिल ठाकूर यांच्यावर रॉडने हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
हल्ल्यानंतर हिंसाचार वाढला
सोहिल ठाकूर यांच्यावर लोखंडी रॉड, चाकू आणि तलवारीने हल्ला होत असल्याचे पाहून त्याचे नातेवाईक आणि सहकारी त्याच्या बचावासाठी पुढे आले. परंतु दंगलखोरांनी त्यांनाही मारहाण केली. सोहिल ठाकूर यांच्यावरील हल्ल्याची बातमी शहरात पसरताच हिंदू समुदायाने निषेध व्यक्त केला. तसेच शहरव्यापी बंदची घोषणा करण्यात आली. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी करत विहिंप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात निदर्शने सुरू केली.
बसची जाळपोळ, वाहनांची तोडफोड
लोकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. पोलिसांशीही बाचाबाची झाली. दगडफेकीत एक तरुण जखमी झाला. यादरम्यान एका बसलाही आग लावली. हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी 10 हून अधिक बसेसची तोडफोड केली. तसेच काही चारचाकी वाहनांचे नुकसान केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरल्याने दुकानदार आपली दुकाने बंद करून पळून जाऊ लागले. वाद वाढत असल्याचे पाहून घटनास्थळी तात्काळ मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन गर्दी पांगवल्यानंतर सहा आरोपींपैकी पाच जणांना अटक केली आहे.
Comments are closed.