तोतया रेल्वे निरीक्षकाला अटक, 20 हजारांची लाच घेताना कल्याणमध्ये पकडले

मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाच्या पथकाने कल्याणमध्ये आज मोठी कारवाई केली. रेल्वे बोर्ड दक्षता निरीक्षक असल्याचे भासवून लाच मागणाऱ्या एका तोतयाला रंगेहाथ अटक केली. हरीश कांबळे असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे. बुकिंग क्लार्ककडून २० हजार रुपये लाच घेताना त्याला पकडले.

कल्याण बुकिंग ऑफिसमध्ये कार्यरत असलेले बुकिंग क्लार्क मंगेश बडगुजर यांनी याप्रकरणी मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाकडे तक्रार केली होती. आरोपी हरीश कांबळे याने स्वतःला रेल्वे बोर्डाचा दक्षता निरीक्षक असल्याचे भासवून डीआरएम कार्यालयातील कथित थकबाकी भरण्याच्या नावाखाली बडगुजर यांच्याकडे ६० हजार रुपयांची मागणी केली होती. या मागणीनुसार आरोपीने फोन पेद्वारे आधीच ४० हजार रुपये उकळले होते. उर्वरित २० हजार रुपये घेण्यासाठी तो गुरुवारी दुपारी २ वाजता कल्याण येथे आला. मात्र यावेळी दक्षता विभागाच्या पथकाने सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले.

Comments are closed.