अॅमेझॉन 14 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

अॅमेझॉन कंपनी पुढील आठवड्यात 27 जानेवारीपासून मोठी नोकरकपात सुरू करणार आहे. यावेळी कंपनी जवळपास 14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. यामध्ये जवळपास 30 हजार महत्त्वाच्या पदांची कपात करण्याचे कंपनीने ठरवले आहे. कंपनीने नोकरकपातीचे समर्थन करताना म्हटले आहे की, ही नोकरकपात कंपनीतील अंतर्गत नोकरशाही कमी करण्याच्या योजनेचा एक भाग आहे. ही कर्मचारी कपात आम्ही एआयमुळे करत नाही, असे स्पष्टीकरण अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी दिले आहे.
27 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कपातीचा थेट कंपनीतील कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. यातील 10 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार आहे. या नोकरकपातीचा परिणाम थेट कॉर्पोरेट आणि महत्त्वाच्या उच्च पदांवरील व्यक्तींवर होणार आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस हा अॅमेझॉनमधील सर्वात फायदेशीर विभाग असूनही मंद वाढीचा सामना करावा लागत आहे.

Comments are closed.