पाकिस्तान आयसीसी विमान, स्वयंपाक देश, देश ओळखणे, कोणाला ओळखणे, देश जाणून घेणे, कोणाचे आहे?

पाकिस्तान T20 विश्वचषक 2026 बातम्या : बांगलादेशने 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली. या निर्णयाला पाठिंबा देत पाकिस्तानही या जागतिक स्पर्धेवर बहिष्कार टाकू शकतो, असे संकेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी दिले आहेत.

मोहसिन नक्वी काय म्हणाले?

शनिवारी माध्यमांशी बोलताना मोहसिन नक्वी म्हणाले, “पाकिस्तान टी20 वर्ल्ड कप खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय आमची सरकार घेईल. पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या देशाबाहेर आहेत. ते परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल. सरकारचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. जर सरकारने परवानगी दिली नाही, तर आयसीसी दुसऱ्या संघाला संधी देऊ शकते.” दरम्यान, बांगलादेशच्या जागी आयसीसीने आधीच स्कॉटलंड संघाला 2026 टी20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरवले आहे.

पाकिस्तान माघार घेतल्यास कोणत्या संघाला मिळणार संधी?

जर पाकिस्ताननेही 2026 टी20 वर्ल्ड कपमधून माघार घेतली, तर युगांडा संघाला या स्पर्धेत स्थान मिळणार आहे. पाकिस्तानच्या अनुपस्थितीत युगांडा संघ ग्रुप-ए मध्ये भारत, नामीबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका यांच्यासोबत खेळताना दिसेल. विशेष म्हणजे, युगांडाने 2024 च्या टी20 वर्ल्ड कपमध्येही सहभाग घेतला होता, मात्र त्यांना गट टप्प्यातच स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते.

पाकिस्तानचे सामने भारतात नाहीत

2026 टी20 वर्ल्ड कपदरम्यान पाकिस्तान संघ भारतात येणार नाही. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित केले जाणार आहेत. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचल्यास उपांत्य सामना देखील श्रीलंकेतच होईल. आणि जर पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली, तर वर्ल्ड कपचा अंतिम सामना देखील श्रीलंकेतच खेळवला जाणार आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी 15 खेळाडूंच्या संघाची अधिकृत घोषणा केली आहे. या संघाचं नेतृत्व सलमान अली आघाकडे देण्यात आले आहे. तर या संघातून वेगवान गोलंदाज हारिस रऊफ आणि अनुभवी फलंदाज मोहम्मद रिजवान यांना वगळण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, खराब फॉर्म असूनही बाबर आझम याच्यावर संघ व्यवस्थापनाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. दरम्यान, टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील पाकिस्तानचा प्रवास 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

पाकिस्तानचे टी-20 विश्वचषकातील गट फेरीचे सामने :

  • पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स : 7 फेब्रुवारी, कोलंबो
  • पाकिस्तान विरुद्ध अमेरिका : 10 फेब्रुवारी, कोलंबो
  • पाकिस्तान विरुद्ध भारत : 15 फेब्रुवारी, कोलंबो
  • पाकिस्तान विरुद्ध नामिबिया : १८ फेब्रुवारी, कोलंबो

पाकिस्तान संघ (पाकिस्तान संघ T20 विश्वचषक 2026) –

सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सॅम अय्युब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान तारिक.

हे ही वाचा –

Ind vs Nz 3rd T20 : हर्षित राणाचा पत्ता कट; न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 साठी अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग 11

आणखी वाचा

Comments are closed.