Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखांच्या जनसंपर्क कार्यालयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो एकत्र लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदाराचा एकनाथ शिंदेंच्या फोटोसह बॅनर लागल्याने सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. आता, या संदर्भात भिवंडी शिवसेना उपतालुकाप्रमुख विवेक म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. म्हात्रे म्हणाले की, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे असून ते आपले गुरुवर्य आणि आधारस्तंभ आहेत. लहानपणापासून त्यांचे मार्गदर्शन मला लाभले असून त्यांनी अनेकवेळा आपल्याला सांभाळून घेतले आहे. त्यामुळेच, त्यांच्या बॅनरवर बाळ्या मामांचा फोटो लावणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed.