तिकीट नसेल चादर आणि सतरंजी द्या, धारशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक, राजन साळवींचा व्हिडीओ व्हायरल
धाराशिव: शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चुकीचे तिकीट वाटप केल्याचा राग धरत शिवसैनिकांनी घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे एबी फॉर्म राजन साळवी यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांना देत वाटप केल्याच्या मुद्द्यावरन शिवसेनेचे कार्यकर्ते आणि राजन साळवी यांच्यातील वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर आता दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
तिकीट नसतील तर आम्हाला चादर आणि सतरंजी आणून द्या
तिकीट नसतील तर आम्हाला चादर आणि सतरंजी आणून द्या, आम्ही निवांत झोपतो अशी विनंती शिवसैनिकांनी राजन साळवी यांना केली आहे. राजन साळवी व शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावल्याने धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राजन साळवी यांनी शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील व मल्हार पाटील यांना देत वाटप केल्याच्या आरोप देखील करण्यात आला आहे. याच मुद्यावरुन शिवसैनिक आणि राजन साळवी यांच्यात बाचाबाची झाली आहे. या घटनेची व्हडीओ देखील व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
शिंदेसेनेला पाठिंबा नाहीच, केडीएमसीतील नगरसेवकांना आदेश; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितली रणनीती
आणखी वाचा
Comments are closed.