IND vs NZ: अभिषेक-सूर्याचं वादळ, टी20 मालिका खिशात! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने फक्त 60 चेंडूत गाठलं 154 धावांचं लक्ष्य

गुवाहाटी येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma and Suryakumar Yadav) आणि सूर्यकुमार यादव यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने केवळ 10 षटकांत (60 चेंडूंत) 154 धावांचे लक्ष्य गाठून नवा इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.

154 धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट गमावली होती. त्यानंतर ईशान किशनने 13 चेंडूंत 28 धावांची वेगवान खेळी केली. मात्र, खरा धमाका अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी केला. अभिषेक शर्माने केवळ 14 चेंडूंत अर्धशतक झळकावले, जे भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मधील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. त्याने 20 चेंडूंत नाबाद 68 धावा केल्या, ज्यात 7 चौकार, 5 षटकार सामील होते.
तसेच कर्णधार सूर्याने सलग दुसरे अर्धशतक ठोकत 26 चेंडूंत नाबाद 57 धावांची खेळी केली.

भारतीय संघाने पहिल्या 6 षटकांत (पॉवरप्ले) 94 धावा केल्या. टी-20 इतिहासातील पॉवरप्लेमधील हा दुसरा सर्वात मोठा स्कोर आहे. (जागतिक विक्रम इंग्लंडच्या नावे 95 धावांचा आहे) पॉवरप्ले संपल्यानंतर भारताला 84 चेंडूंत 60 धावांची गरज होती, मात्र भारतीय फलंदाजांनी उरलेल्या 60 धावा केवळ 24 चेंडूंत पूर्ण करत सामना संपवला.

Comments are closed.