मध्य प्रदेशात नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त.

जंगलातून रायफल-पिस्तूल, 48 काडतुसे आणि 43 डेटोनेटर्स जप्त

वृत्तसंस्था/ गारियाबंद (मध्यप्रदेश)

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त गारियाबंद जिह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का दिला आहे. गुप्त माहितीच्या आधारे, संयुक्त कारवाईत सैन्याने जंगल आणि डोंगराळ भागातून शस्त्रs, स्फोटके आणि दळणवळण उपकरणे जप्त केली. जप्त केलेल्या साहित्यात पोलिसांकडून लुटलेली एक रायफल, एक पिस्तूल, 48 काडतुसे आणि 43 डेटोनेटर्सचा समावेश होता. ही शस्त्रs सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी आणि ग्रामीण भागात दहशत पसरवण्यासाठी वापरण्याचा हेतू होता. मैनपूर पोलीसस्थानक परिसरातील कुकरार गाव आणि पीपरखेडी पोलीसस्थानक परिसरातील कामरभौदी गावातील जंगली आणि डोंगराळ भागात ही कारवाई करण्यात आली. या भागात नक्षलवादी संघटनेने शस्त्रs आणि स्फोटके लपवली असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर, जिल्हा पोलीस दलाच्या ई-30 पथक, छत्तीसगड सशस्त्र दल (सीएएफ) आणि सीआरपीएफ यांचे संयुक्त पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले होते.

Comments are closed.