अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज

भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा सध्या टी-20 सामन्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. अभिषेक त्याच्या प्रत्येक खेळीत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरूद्ध मालिकेतील तीनपैकी दोन सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केल्या. तिसऱ्या टी-20 सामन्यातील खेळीसह तर त्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला.

अभिषेक शर्माने तिसऱ्या टी-20 सामन्यात अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे अर्धशतक त्याने पॉवरप्लेमध्ये पूर्ण केलं. यासह तो पॉवरप्लेमध्ये टी-20 सामन्यांत सर्वाधिक 3 अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. याशिवाय अभिषेक शर्माने नवव्यांदा टी-20 मध्ये 25 किंवा त्याच्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे, अशी कामगिरी करणारा जगात तो पहिलाच खेळाडू आहे. याशिवाय त्याने अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरूद्ध गुवाहाटीमधील तिसऱ्या टी-20 सामन्यात 20 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 340 होता. या खेळीदरम्यान अभिषेकने एकही डॉट बॉल खेळला नाही. अभिषेक शर्मा हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही डॉट बॉल न खेळता सर्वात मोठी खेळी कऱणारा जगातील पहिला खेळाडू ठरला.

भारताने 154 धावांचं लक्ष्य सहज गाठलं. अभिषेकने 20 चेंडूत सात चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 68 धावा केल्या, तर सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत सहा चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव फॉर्मात परतल्यानंतर त्याने सलग दुसरी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 40 चेंडूत 102 धावांची भागीदारी केली आणि भारताने अखेर 10 षटकांत 2 बाद 155 धावा करत सामना आपल्या नावे केला. हा सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली.

Comments are closed.