पोलीस उपअधीक्षक अनुज यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला
व्रतसंस्था/ प्रयागराज
अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशच्या संभलचे पोलीस उपअधीक्षक अनुज चौधरी आणि तत्कालीन निरीक्षक अनुज तोमर यांना मोठा दिलासा देत कनिष्ठ न्यायालयाच्या एका आदेशाला स्थगिती दिली आहे. या आदेशात अनुज चौधरी यांच्या विरोधात एफआयआर नोंद करण्यास सांगण्यात आले होते. संभल येथील पोलिसांच्या कारवाईमुळे अनुज चौधरी यांचे नाव देशभरात चर्चेत राहिले होते.
एकूण 20 पोलिसांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्याचा निर्देश कनिष्ठ न्यायालयाने दिल होता. आता न्यायाधीश समित गोपाल यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने अनुज चौधरी आणि उत्तरप्रदेश सरकारच्या याचिकेवर सुनावणीनंतर स्थगिती आदेश जारी केला आहे. न्यायालयाने तक्रारकर्ता यामीनकडून याप्रकरणी जबाब मागवत पुढील सुनावणी 5 आठवड्यांनी निश्चित केली आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणीपर्यंत संबंधित पोलिसांच्या विरोधात कुठलीच दंडात्मक कारवाई होणार नाही.
Comments are closed.