नवरा असावा तर असा, बायकोसाठी दरवर्षी खरेदी करतो 3 किलो सोने

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानात सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत. सोन्याच्या किंमती दीड लाखांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे एक तोळा सोने खरेदी करतानाही दहा वेळा विचार करावा लागत आहे. परंतु, दुबईत वास्तव्यास असलेल्या आणि मूळच्या हिंदुस्थानी एका जोडप्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या महिलेने दावा केला आहे की, तिचा पती तिला दरवर्षी न चुकता 3 किलो सोने गिफ्ट करतो.

नेटफ्लिक्सने आपली नवीन रियलिटी सीरिज देसी ब्लिंगचा ट्रेलर जारी केला आहे. यामध्ये या महिलेने दावा केला आहे. महिलेच्या तोंडून हे शब्द ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या ट्रेलरमध्ये सतीश संपाल यांची पत्नी तबिंदा संपाल यांनी कॅमेऱ्यासमोर हा दावा केला आहे.

तंबिदा यांनी हसत सांगितले की, पती सतीश आपल्याला न चुकता दरवर्षी 3 किलो सोने खरेदी करून देत आहे. सोन्याचा दर सध्या दीड लाख रुपये आहे. या हिशोबाप्रमाणे 3 किलो सोन्याची किंमत थेट साडे चार कोटी रुपये होते.

या शोमध्ये दाखवले जात आहे की, दुबईत राहत असलेले हिंदुस्थानी नागरिक कसे जीवन जगत आहेत. त्यांची लक्झरी कार, कोटय़वधींची प्रॉपर्टी डील, हायप्रोफाइल पाटर्य़ांचा समावेश आहे. सतीश संपाल यांचा हिंदुस्थानातील जबलपूर येथे जन्म झाला आहे. काही दशकांपूर्वी ते 80 हजार घेऊन दुबईत पोहोचले होते. आज ते कोटय़वधी रुपयांचे मालक आहेत.

आज त्यांचा दुबईत वास्तविक इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि मीडिया सेक्टरमध्ये बिझनेस पोहोचला आहे. सतीश संपल यांनी या वर्षीच्या सुरुवातीला आपल्या एका वर्षाच्या मुलीला कोटय़वधी रुपयांची रोल्स रॉयल्स भेट म्हणून दिली होती.

Comments are closed.