शरद पवारांची नात रेवतीचे ठरले लग्न, सुप्रिया सुळेंनी शेअर केले लेक व जावयाचे फोटो
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नात व सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचे लग्न ठरले आहे. नागपूर येथील व्यावसायिक अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी याच्यासोबत रेवतीचे लग्न होणार आहे. सुप्रिया सुळे यांनी इंस्टाग्रामवर लेकीचे व जावयाचे फोटो शेअर केले आहेत.
सारंग लखानी हा विश्वराज ग्रुपचा अध्यक्ष आहे. त्याने अमेरिकेतील कोलंबिया बिझनेसस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. तर रेवतीने लंडनमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवीचे शिक्षण घेतले आहेत.
आम्हाला हे कळवायला आनंद होत आहे की आमची मुलगी रेवती हिचे अरुण लखानी व वंदना लखानी यांचा मुलगा सारंग लखानीसोबत लग्न ठरले आहे, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी रेवती व सारंगचे फोटो शेअर केले आहेत.यात दोन फोटो हे रेवती आणि सारंगचे व एक फोटो सदानंद सुळे व सारंगचा आहे.
रेवती होणार नागपूरची सून
सारंख लखानी हा नागपूरमधील व्यावसायिक अरुण लखानी यांचा मुलगा आहे. ते मूळचे नागपूरचेच असून रेवती ही लग्नानंतर नागपूरची सून होणार आहे.
Comments are closed.