डबल ‘सुपर’ ओव्हरचा थरार! अफगाणिस्तानचा संघ लढला, पण दक्षिण आफ्रिकेने विजयाची पताका फडकावली
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर क्रीडाप्रेमींना सुपर ओव्हरचा हिट ड्रामा पाहायला मिळाला. टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 187 धावाच करू शकला आणि सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावण्याचे ठरले.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताने प्रथम फलंदाजी करताना 17 धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेचा संघही 17 धावाच करू शकला. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात आली. यात आफ्रिकेने 23 धावा चोपल्या आणि अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 24 धावाचे आव्हान ठेवले. त्यानंतर अफगाणिस्तानला 19 धावांमध्ये रोखत 4 धावांनी विजय मिळवला.
तत्पूर्वी अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. रयान रिकल्टन याने सर्वाधिक 61 धावांचे योगदान दिले. त्याने अवघ्या 28 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 217 च्या स्ट्राईक रेटने या धावा चोपल्या. त्याच्या खालोखाल क्विंटन डी कॉक याने 59 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून ओमारजाई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर राशिद खानने 2 आणि फारुकीने 1 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली.
विजयासाठी 188 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात दमदार झाली. गुरबाज आणि झारदान या जोडीने अर्धशतकीय सलामी दिली. मात्र त्यानंतर अवघ्या दोन धावात तीन विकेट्स गमावल्याने अफगाणिस्तानचा डाव संकटात सापडला. एका बाजुने विकेट्स जात असताना दुसऱ्या बाजुने गुरबाजने मैदानात शड्डू ठोकला आणि 42 चेंडूत 84 धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 7 षटकार ठोकले. 19व्या षटकापर्यंत अफगाणिस्तानच्या 9 बाद 175 धावा झाल्या होत्या. नूर अहमद आणि
अखेरच्या षटकातील थरार
अखेरच्या षटकात चेंडू आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज कागिसो रबाडाकडे होता. अफगाणिस्तानला 13 धावांची, तर आफ्रिकेला 1 विकेटची गरज होती. या षटकात रबाडाने दोन नो बॉल टाकल्याने आणि नूरने षटकार ठोकल्याने सामना अफगाणिस्तानच्या बाजुने झुकला होता. पण चौथ्या चेंडूवर फारुकी धावबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला.
रबाडाने टाकलेले अखेरचे षटक
पहिला चेंडू – नो बॉल आणि एक धाव
पहिला चेंडू – वाईड
पहिला चेंडू – निर्धाव
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – निर्धाव
चौथा चेंडू – नो बॉल आणि 2 धावा
चौथा चेंडू – विकेट्स
Comments are closed.