ICC T20 World Cup 2026 – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श स्पर्धेतून बाहेर; दिग्गज खेळाडूची लागली वर्णी!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टी20 वर्ल्ड कप सुरू होताच ऑस्ट्रेलियाला मोठा हादरा बसला आहे. दुखापतीमुळे कर्णधार मिचेल मार्श आज (11 फेब्रुवारी 2026) आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात मैदानात उतरला नव्हता. मात्र, आता माहिती समोर येतीये की मिचेल मार्श संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला वेळ लागणार असल्याने त्याच्याजागी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यामध्ये सामना सुरू आहे. दुखापतीमुळे मिचेल मार्श मैदानात उतरला नाही. त्यामुळे त्याच्याजागी ट्रॅव्हिस हेडवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सामना सुरू असतानाच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने माहिती दिली की, मिचेल मार्श दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मिचेल मार्शला विश्रांतीची गरज आहे. मिचेल मार्शच्या जागी राखीव खेळाडू म्हणून स्टीव्ह स्मिथला संधी मिळण्याची शक्यता आहे. स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा आक्रमक आणि दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, फेब्रुवारी 2024 पासून तो ऑस्ट्रेलियासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. परंतू नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स कडून खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून अशा धमाकेदार खेळीची संघाला अपेक्षा असणार आहे.

Comments are closed.