मोदी, मोदी… चोर आहे… चोर आहे! मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांच्या तुंबळ घोषणा!
मुंबई महानगरपालिकेत तब्बल चार वर्षांनंतर तुंबळ घोषणाबाजीत बुधवारी महापौर, उपमहापौर बसले! 38 वर्षांनंतर आपला महापौर बसवण्याचा डाव साधलेल्या भाजप-मिंध्यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी ‘मोदी… मोदी’ अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेकडून ‘चोर है, चोर है’ अशा घोषणांनी प्रत्युत्तर देत सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘ठाकरे, ठाकरे’ अशा घोषणांनी शिवसेनेच्या रणरागिणी आणि शिलेदारांनी पालिका सभागृह गाजवले! या गदारोळातच पीठासीन अधिकारी आयुक्त भूषण गगराणी यांनी महापौर पदी महायुतीच्या रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी संजय घाडी यांच्या निवडीची घोषणा केली.
Comments are closed.