लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपाखाली श्रेयस तळपदेसह अन्य 12 जणांविरुद्ध FIR दाखल – Tezzbuzz

अभिनेता श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये गाजलेला अभिनेता आहे पण नुकत्याच त्याच्या व्ययक्तिक कारणामुळे तो पुन्हा चर्चेत आलेला आहे. मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव येथे गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी यांच्यासह १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, सागा ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या एलयूसीसी बँकेने गुंतवणुकीच्या नावाखाली निष्पाप लोकांकडून कोट्यवधी रुपये वसूल केले होते. 2015 मध्ये भोगाव शहरात उघडलेली ही बँक 2024 मध्ये अचानक बंद पडली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अडकले. तेथील रहिवासी विकास तिवारी यांनी आणि इतरांनी या बँकेत गुंतवणूक केली होती. जेव्हा त्यांनी समीर अग्रवाल यांना त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा त्यांना नकार दिला आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. पोलिसानी तक्रार ऐकून न घेतल्याने, पीडितांनी न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाच्या आदेशानंतर आता सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल, त्यांची पत्नी सानिया अग्रवाल, चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदे, आरके शेट्टी, निधी व्यवस्थापक संजय मुदगील, शबाब हुसेन, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी यांच्याविरुद्ध अहवाल दाखल करण्यात आला आहे. तर प्रभारी निरीक्षक प्रदीप कुमार पांडे यांनी सांगितले योग्य ती कारवाई केली जाईल,तसेच सध्या या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) 96 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला त्याच्या अनेक उत्कृष्ट भूमिकांसाठी प्रक्षेकांनी त्याला आठवणीत ठेवले आहे. त्याने ओम शांती ओम, गोलमाल ३, पुष्पा: द राईज १ आणि इक्बाल सारख्या उल्लेखनीय चित्रपटांचा भाग आहे. गेल्या वर्षीच्या बागी 4 या चित्रपटातही त्याने एक प्रभावी भूमिका साकारली होती. श्रेयसने मनोरंजन उद्योगात आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमी आणि टेलिव्हिजनमधून केली होती.

तिहार तुरुंगात असलेल्या राजपाल यादवच्या समर्थनार्थ आला मिका सिंगल; केले हे वक्तव्य

Comments are closed.