दिल्लीत तिघांच्या हत्येप्रकरणी तंत्रज्ञाला अटक
धनलाभाच्या आमिषाने विष मिसळवलेले लाडू दिले खायला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या पश्चिम विहार भागात पोलिसांनी तीन जणांना संपत्तीचे आमिष दाखवून (अचानक धनलाभ) विष देऊन त्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका तांत्रिकाला अटक केली आहे. आरोपीने तिघांना विष मिसळवलेले लाडू खायला दिल्यानंतर त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे नाव कमरुद्दीन उर्फ बाबा असे आहे. तो उत्तर प्रदेशातील फिरोजाबादचा रहिवासी असून तो लोणी आणि फिरोजाबादमध्ये तांत्रिक केंद्र चालवत होता.
8 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या पीरागढी उ•ाणपुलाजवळ एका बंद कारमध्ये तीन जणांचे मृतदेह आढळले. मृतांची ओळख 76 वर्षीय रणधीर, 47 वर्षीय शिव नरेश सिंह आणि 40 वर्षीय लक्ष्मी देवी अशी झाली आहे. रणधीर ड्रायव्हरच्या सीटवर होता, तर इतर दोघे मागच्या सीटवर होते. कमरुद्दीन सुमारे एक वर्षापासून तीन पीडितांच्या संपर्कात होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो त्या दिवशी कारच्या बाजूच्या सीटवर बसलेला दिसत होता. इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवणे आणि लोकेशन डेटानेही या घटनेत त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध केले.
Comments are closed.