मृत्यू गटात नेपाळ खाते उघडणार
पहिल्या सामन्यात इंग्लंडला झुंजवणारा नेपाळचा संघ आपल्या दुसऱया सामन्यात नवोदित इटलीशी भिडणार आहे. नेपाळचा खेळ पाहता मृत्यू गट झालेल्या ‘क’ गटात नेपाळ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक आहे. या विजयासह नेपाळ गटात दुसऱया स्थानावरही झेप घेऊ शकतो. विंडीजकडून मिळालेल्या पराभवामुळे क गटात दुसऱया स्थानासाठी दोन किंवा तीन संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. दुसऱयांदा स्पर्धेत खेळत असलेल्या नेपाळला एकही विजय मिळवता आला नसला तरी इटलीविरुद्ध तो आपल्या गुणांचे खाते उघडण्याचा प्रबळ दावेदार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या सामन्यात कुशल भुरटेल, कर्णधार रोहित पौडेल, दीपेंद्र सिंग ऐरी आणि लोकेश बाम यांनी दमदार खेळ केला होता. आता इटलीविरुद्धही त्यांचा खेळ बहरेल. नेपाळचा विजय ‘क’ गटात सुपर एटसाठी संघर्ष निर्माण करणार यात शंका नाही.
श्रीलंकेला विजयाची अपेक्षा
टी-20 क्रिकेटमध्ये कोणताही संघ विजयासमीप पोहोचू शकतो हे आपण गेल्या पाच दिवसांत अनेकदा पाहिले आहे. श्रीलंकेने विजयी सलामी दिली आहे आणि आता ते ओमानविरुद्धही विजय मिळवून आपला सुपर एटचा प्रवास अधिक बळकट करतील.
Comments are closed.