ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर विजय; एलिस, झम्पाची अचूक गोलंदाजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कर्णधार मिशेल मार्श नसताना आणि केवळ 12 उपलब्ध खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर आयर्लंडवर 67 धावांनी मोठा विजय मिळवला. केवळ षटकारांवर अवलंबून नसलेली फलंदाजी आणि टोकदार गोलंदाजी यामुळे ऑस्ट्रेलियाने आपली ताकद ठळकपणे दाखवून दिली. नॅथन एलिस आणि अॅडम झाम्पा यांची अचूक गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक ठरली. 4 बळी टिपणारा एलिस ‘सामनावीर’ ठरला.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव 16.5 षटकांत 115 धावांवर संपुष्टात आला. पाठलागाच्या पहिल्याच चेंडूवर आयर्लंडला मोठा धक्का बसला. कर्णधार पॉल स्टार्ंलग दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. झेव्हियर बार्टलेटच्या फुल डिलिव्हरीवर फटका मारून धाव घेतल्यानंतर तो वेदनेने थांबला आणि काही वेळात मैदानाबाहेर गेला. या धक्क्यातून हा संघ पुन्हा उभा राहू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाची संयमी फलंदाजी

दरम्यान, नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना आज ऑस्ट्रेलियाचा वेगळा चेहरा दिसला. ‘फक्त षटकारांची टीम’ अशी ओळख असली तरी, खेळपट्टी आणि गोलंदाजी पाहता त्यांनी परिस्थितीनुसार फलंदाजी केली. जोश इंग्लिस आणि पॅमेरॉन ग्रीनच्या सुरुवातीच्या फटक्यांनंतरही संघाने संयम राखत 6 बाद 182 धावा उभारल्या. या खेळपट्टीवर हा स्कोअर स्पर्धात्मक ठरला. प्रभारी कर्णधार ट्रव्हिस हेड (6) अपयशी ठरल्यानंतर जोस इंग्लिस (37), पॅमेरॉन ग्रीन (21), मॅट रेनशॉ (37) व मार्कस स्टोईनिस (45) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात केवळ 35 डॉट बॉल्स गेले, तर 22 वेळा दोन धावा काढण्यात आल्या.

Comments are closed.