Babanrao Taywade Nagpur : जातीनिहाय जनगणना करण्यास विरोध, बबनराव तायवाडेंचा आंदोलनाचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : जातीनिहाय जनगणना करण्यास विरोध, बबनराव तायवाडेंचा आंदोलनाचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र राष्ट्रीय जनगणनेसाठी नागरिकांना जी एकत्तिस प्रश्नांची प्रश्नावली भरून द्यायची आहे, त्या प्रश्नवलीत कुठेही नागरिकांच्या जातीचा व. इतर मागासवर्गीय प्रवर्गात असल्याचा उल्लेख नसल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 23 मार्च ला दिल्ली येथे एक दिवसाचे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रश्नावलीच्या बाराव्या क्रमांकावर नागरिकांना ते कोणत्या प्रवर्गात येतात याची माहिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर यापैकी एक या स्वरूपात भरायची आहे.
यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे, प्रश्नावलीत एक स्वतंत्र प्रश्न हा जाती संदर्भात असावा.
सोबतच बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , इतर सह इतरमागासवर्गीय प्रवर्गा या स्वरूपात माहिती भरून घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे.
ओबीसींची जनगणना झाल्या शिवाय ओबीसीं समाजाला संविधानात तरतूद असलेल्या सुविधांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ओबीसींची जनगणना हि जात निहाय व्हावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे.
Comments are closed.