T20 WC26: श्रीलंकेचा सलग दुसरा विजय, ओमानचा मोठ्या धावसंख्येच्या फरकाने पराभव

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ आजचा (गुरूवार, १२ फेब्रुवारी) पहिला सामना श्रीलंका विरुद्ध ओमान यांच्यात खेळला गेला. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. दुखापतीमुळे मोठा खेळाडू स्पर्धेबाहेर झाल्याने श्रीलंकेचा आत्मविश्वास मात्र कमी झालेला दिसला नाही. त्यांनी हा सामना १०५ धावांनी जिंकला. तसेच यामध्ये श्रीलंकेकडून तीन खेळाडूंनी अर्धशतके केली. पवन रत्नानायकेला प्लेयर ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला.

फलंदाजीला सुरूवात केल्यावर श्रीलंकेने पहिल्या दोन विकेट्स लवकर गमावल्या. त्यानंतर विकेटकीपर-फलंदाज कुशल मेंडिस आणि पवन रत्नानायके यांनी संघाचा डाव सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५० चेंडूत ९४ धावांची भागीदारी केली. पवन २८ चेंडूत ६० धावा करत बाद झाला. मग कुशलने कर्णधार दसुन शनाकाच्या साहय्याने ओमानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी २८ चेंडूत ६३ धावांची भागीदारी केली. शनाका २० चेंडूत ५० धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने दोन चौकार आणि ५ षटकार मारले. मेंडिस ४५ चेंडूत ६१ धावा रनआऊट झाला.
कामिंदू मेंडिस

त्यामुळे श्रीलंकेने २० षटकात ५ विकेट्स गमावत २२५ धावा केल्या.

बातमी अपडेट होत आहे.

Comments are closed.