T20 WC26: इंग्लंडला धक्का देणारा नेपाळ ईटलीकडून पराभूत, वाचा नक्की काय झाले सामन्यात

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (गुरूवार, १२ फेब्रुवारी) दुसरा सामना ईटली विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला गेला. हा सामना सुरू होण्याआधी नेपाळ जिंकेल की काय असे वाट असताना ईटलीने बाजी मारली. त्यांनी १० विकेट्स असा मोठा विजय मिळवला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेव्या या सामन्यात ईटलीचा कर्णधार हॅरी मॅनेंटीने नाणेफेक जिंकत नेपाळला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. कारण नेपाळ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. त्यांच्या एकाही खेळाडूने अर्धशतकी खेळी केली नाही किंवा ३० पेक्षा अधिक धावा केल्या नाही. त्यांच्यामध्ये सर्वाधिक धावा आरिफ शेखने केल्या. त्याने २४ चेंडूत २७ धावा केल्या. तसेच कर्णधार रोहित पौडेल सोबत ४१ धावांची आणि दिपेंद्र सिंग एरीसोबत ४४ धावांची भागीदारी केली. त्यामुळे नेपाळने १९.३ षटकात सर्वबाद १२३ धावसंख्या उभारली. ईटलीकडून बेन मॅनेंटीची गोलंदाजी प्रभावी ठरली. त्याने ४ षटकात ९ धावा देत २ विकेट्स घेतल्या.
ईटलीचा हा पहिलाच टी२० विश्वचषक आहे. यामुळे ते पहिल्या विजयासाठी आसुसलेले होते. आज तो त्यांना मिळाला.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.