अभिषेक शर्मा बाहेर, संजू सॅमसन संघात; टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 मोठे बदल, नामिबियाचा संघही बदलला

नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेक शर्माची प्रकृती अद्याप सुधारलेली नाही, ज्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट होऊन टीम इंडियामध्ये परतला आहे. नामिबियानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २ मोठे बदल केले आहेत.

​भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसच्या वेळी सांगितले की, अभिषेक शर्मा अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही, त्यामुळे तो नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खेळत नाहीये. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आजारपणामुळे यूएसए विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. बुमराहच्या पुनरागमनामुळे मोहम्मद सिराजला अंतिम ११ मधून बाहेर बसावे लागले आहे.

​दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी ओळखली जाते. भारत-नामिबिया सामन्यासाठी या खेळपट्टीवर थोडं गवत आणि हलक्या भेगा आहेत. बाउंड्री लहान असल्यामुळे षटकार मारणे सोपे जाईल. तज्ज्ञांच्या मते, खेळपट्टीवरून चांगला बाऊन्स मिळेल आणि चेंडू बॅटवर व्यवस्थित येईल, मात्र फिरकी गोलंदाजांना फारशी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. या सर्व गोष्टी एका मोठ्या धावसंख्येकडे इशारा करत आहेत. विशेष म्हणजे, या मैदानावर टी-२० मधील सर्वोच्च धावसंख्या २७८ आहे, जी सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध बनवली होती.

Comments are closed.