अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून OUT, सूर्यकुमार यादवनं दिली भारतीय चाहत्यांना धडकी
अभिषेक शर्मा T20 विश्वचषक 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारत आणि नामीबिया यांच्यातील 18वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. नामीबियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर अभिषेक शर्मा संघाबाहेर गेले आहेत. तसेच मोहम्मद सिराजच्या जागी जसप्रीत बुमराहचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. नामीबियाच्या संघातही दोन बदल करण्यात आले असून, दोन्ही संघांनी महत्त्वाच्या बदलांसह या सामन्यात प्रवेश केला आहे.
🚨 नाणेफेक 🚨#TeamIndia प्रथम फलंदाजीला उतरले आहे.
अपडेट्स ▶️ https://t.co/SQLoaZjq98#T20WorldCup | #मेनइनब्लू | #INDvNAM pic.twitter.com/66F5jp0Dp7
— BCCI (@BCCI) १२ फेब्रुवारी २०२६
कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती आणि त्याबाबत आम्ही खूप आनंदी आहोत. जोपर्यंत आम्ही नाणेफेक हरतोय, पण सामना जिंकतोय, तोपर्यंत आम्हाला काही अडचण नाही. आज दव हा मोठा भाग ठरू आहे. मात्र लक्ष्याचा बचाव करताना संघाचा आत्मविश्वास वाढतो.”
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞: अभिषेक शर्मा अजूनही त्याच्या आजारातून बरा आहे आणि निवडीसाठी अनुपलब्ध होता. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.#TeamIndia | #T20WorldCup | #मेनइनब्लू | #INDvNAM
— BCCI (@BCCI) १२ फेब्रुवारी २०२६
अभिषेक शर्माबद्दल सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
त्याने पुढे सांगितले, “अभिषेक अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो एक-दोन सामने खेळू शकणार नाही. त्याच्या जागी संजू संघात येत आहे. तोही तसाच आक्रमक आणि स्फोटक फलंदाज आहे. तसेच सिराजच्या जागी बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे.”
अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून OUT…
अभिषेक अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तो पुढचे एक-दोन सामने खेळू शकणार नाही, असे सूर्या म्हणाल. त्यामुळे चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारण येत्या 15 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांची झोप उडवणारा भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा या सामन्यातून बाहेर पडू शकतो, पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात खेळणार नाही. खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादवने या बातमीला दुजोरा दिला.
भारतीय संघाची प्लेइंग-11 : संजू सॅमसन, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
नामिबिया संघाची प्लेइंग-11 : लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन, रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्झ, बेन शिकोंगो, मॅक्स हिंगो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.