शंभूराज देसाई यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत, शिवेंद्रराजेंचं पत्रकारांना मिश्किल उत्तर….

सातारा : सातारा जिल्हा परिषद निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित सत्ता येऊ शकते, असं चित्र निर्माण झालं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांपैकी 27 जागा भाजपला मिळाल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 20  आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. तर, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विजय मिळवला आहे. या सर्व घडामोडींनंतर आज शिवेंद्रराजे भोसले आणि शंभूराज देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं आमने सामने आले होते.  यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर मिश्किल उत्तर दिलं.

शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?

आज भाजप मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त आमने सामने आले. या बैठकीनंतर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पत्रकारांनी जिल्हा परिषदच्या सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारले.  मंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत.हात मिळवायचा काय, आम्ही मिठी मारायला देखील तयार आहोत. मात्र, त्यांना ते चालतंय का बघा अशी मिश्किल कोपरखळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मारली आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांनी शेजारी उभे असणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांकडे इशारा करत त्यांनी मला बोलावले आणि मी गेलो नाही असं कधी झालं नाही. फक्त या आधी मला थेट निरोप मिळाला नव्हता.मात्र जिल्हा परिषदेत तुम्ही दोघे एकत्र येणार का ?असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर भाजप कडे संख्याबळ जारी जास्त असलं तरी पालकमंत्री मोठे आहेत आणि मोठ्यांनी सामावून घेतलं पाहिजे.दोन बैठकांना बोलावून देखील तुम्ही आला नाही असे विचारल्यावर त्यावेळी वातावरण ठीक नव्हते मात्र आता चांगले झालं आहे, असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

शंभूराज देसाई यांनी दोन दिवस बोललो असून आज बोलणार नसल्याचं म्हटलं. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात पुढील चर्चा वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून करणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुती म्हणून लढण्यासंदर्भात शंभूराज देसाई यांनी प्रयत्न केले होते. त्याला यश आलं नव्हतं.  त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येत निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या संख्याबळाची बेरीज केल्यास त्यांची जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊ शकते.

सातारा जिल्हा परिषदेतील संख्याबळ

भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : २०
शिवसेना :15
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस :01
इतर :01

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.