IND vs NAM: नामीबियाने टॉस जिंकला, टीम इंडियाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी, संघात 2 मोठे बदल

टी20 वर्ल्डकप 2026 मधील 18 व्या सामन्यात आज भारत आणि नामिबिया भिडणार आहेत. हा सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमध्ये खेळला जात आहे. दोन्ही संघाचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेला 30 धावांनी हरवले. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने मॅच विनिंग खेळी केली. तर दुसरीकडे, नामिबियाला पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने धूळ चारली.
या सामन्यात नामिबिया संघाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल झाले आहेत. अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला आणि सिराजच्या जागी बुमराहला संघात संधी मिळाली आहे.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
नामिबिया: लॉरेन स्टीनकॅम्प, जॉन फ्रिलिंक, जॉन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (उजवीकडे), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यूके), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड शॉल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो
भारतीय संघाचा पुढील सामना 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतात खेळला जाणार नसून श्रीलंकेतील कोलंबो येथे होईल.
Comments are closed.