इटलीचा ऐतिहासिक पराक्रम! नेपाळला चारली धूळ, 10 गडी राखून मिळवला विजय

इटलीने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आपल्या पहिल्या विजयाची चव चाखली आहे. वानखेडेच्या मैदानावर इटलीचा हा पहिला विजय ऐतिहासिक ठरला आहे. संघाने एकातर्फी सामन्यात नेपाळचा १० गडी राखून धुव्वा उडवला. नेपाळकडून मिळालेले १२४ धावांचे लक्ष्य अँथनी आणि जस्टिन मोस्का या जोडीने मिळून अवघ्या १२.४ षटकांतच पूर्ण केले. जस्टिनने ४४ चेंडूत ६० धावांची दमदार खेळी केली, तर अँथनीने केवळ ३२ चेंडूत ६२ धावांची झंझावाती खेळी साकारली. इटलीच्या क्रिकेटपटूंसाठी हा क्षण अत्यंत खास आहे.”

Comments are closed.