टॉप वर फक्त आम्हीच! नामिबियाला नमवून टीम इंडिया अव्वल स्थानी, Point Table मध्ये फेरबदल; पाकिस्त
भारताने NAM T20 विश्वचषक 2026 चा पराभव केला: सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं नामिबियाचा 93 धावांनी धुव्वा उडवून, टी-20 विश्वचषकात आपला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नामिबियाला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं आणि आपल्या विजयाचा जणू पाया रचला. त्यानंतर हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्या आक्रमणासमोर नामिबियाचा अख्खा डाव 116 धावांत गडगडला. त्याआधी, भारतानं 20 षटकांत नऊ बाद 209 धावांची मजल मारली होती. भारताकडून ईशान किशननं 24 चेंडूत 61 धावांची आणि हार्दिक पंड्यानं 28 चेंडूत 52 धावांची खेळी उभारली.
साठी सर्वात मोठा विजय मार्जिन #TeamIndia आयसीसी पुरुषांमध्ये धावांनी #T20WorldCup 💪
द #मेनइनब्लू नामिबियाचा 9️⃣3️⃣ धावांनी पराभव करून सलग 2️⃣ विजय मिळवले!
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/SQLoaZjq98#INDvNAM pic.twitter.com/b0PL2LLSbI
— BCCI (@BCCI) 12 फेब्रुवारी 2026
पाकिस्तानला मोठा धक्का; गुणतालिकेत फेरबदल
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वच आघाड्यांवर चमकदार कामगिरी केली. या विजयामुळे भारताने गट ‘अ’ मध्ये पाकिस्तानला मागे टाकत थेट अव्वल स्थान पटकावले आहे. या 93 धावांच्या मोठ्या विजयामुळे भारताचा ‘नेट रन रेट’ देखील सुधारला आहे. या विजयाचा सर्वात मोठा फटका पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला बसला आहे. भारताने सलग दुसरा विजय नोंदवल्यामुळे पाकिस्तानची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. अमेरिकेला नमवल्यानंतर आता नामिबियावर विजय मिळवून टीम इंडियाने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. आता सर्वांचे लक्ष रविवारी (15 फेब्रुवारी) होणाऱ्या हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. गुणतालिकेतील वर्चस्व आणि प्रतिष्ठेसाठी हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा विजय!
भारताने नामिबियावर तब्बल 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. धावांच्या फरकाच्या दृष्टीने हा भारताचा टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी भारताचा सर्वात मोठा विजय 2012 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 90 धावांचा होता. धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या विजयांच्या यादीत भारत सध्या दहाव्या क्रमांकावर आहे. यासोबतच टीम इंडियाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये सलग 10 सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. हा विक्रम क्रिकेटविश्वात ऐतिहासिक मानला जात आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे सर्वात मोठे विजय
93 धावा – विरुद्ध नामिबिया (2026)
90 धावा – विरुद्ध इंग्लंड (2012)
73 धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2014)
71 धावा – विरुद्ध झिम्बाब्वे (2022)
68 धावा – विरुद्ध इंग्लंड (2024)
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.